चरित्र मोठ्यांची सांगावी, ऐकावी आणि लिहावी.
मी एक आंग्ल-मराठी मुलगी असून मानसशास्त्राची पदवीधर आहे आणि पदव्युत्तर अभ्यास करीत आहे.
सायकल चालविणे.
अश्वारोहण करणे.
तत्वज्ञानाचा अभ्यास करणे.
धर्माबद्दल मूलभूत चर्चा करणे.
विविध प्रतिक्रियाः
*खान्देश मधून पुण्याला आले तेव्हा जेवढा त्रास झाला व भेदाभेद जाणवली तेवढी भारतातून इंग्लंडला आले तेव्हा जाणवली नाही.
इथे नवीन मित्र-मैत्रीणी मिळाल्या. लोक मोकळे आहेत, वर्णभेद नाही, भाषाभेद नाही.
अजुनही पुण्यात आल्यावर माझ्या "चहा पिली" किंवा तत्सम गोष्टींची अनेक महिने "सदाशिव पेठींनी" केलेली टिंगल आठवली की किव येते.
येथे जातिभेद नाही.
मी परत जाईन कायमसाठी आलेले नाही पण...मुसळ आणि कुसळ...बाळ्या आणि कार्टे मनात आल्याशिवाय राहात नाही.
जाता जाता....पुण्यात १२ वषे काढलीत..इथे १० झालीत.
स्निग्धा
*विवाहपूर्व संबंध, किंवा तत्सम चर्चा वाचून , मनकवडा यांनी लिहिलेले काही मुद्दे पुन्हा विचारात आणायची गरज वाटल्याने मी ही चर्चा नवीन सदरात आणत आहे
*
धर्मांचा विचार केल्यास ख्रिश्चन धर्मांधता ही पाश्चात्य जगातून कमी होत आहे व मानवी मूल्ये हे धर्मापेक्षा महत्वाची ही विचारसरणी वाढत आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य हे धर्मापेक्षा जास्त महत्वाचे ही बाब मान्य आहे. (हे योग्य की अयोग्य हा भाग निराळा)
मुद्दा असा की द विंची कोड लिहिल्यावर लेखकाला जीवाची भिती नाही. याउलट असेच लिखाण आपल्या धर्माबद्दल, महापुरुषांबद्दल किंवा संस्कृतीबद्दल करणाऱ्याला जीवानीशी मारणे किंवा मारहाण करणे हे बेकायदेशीर असले तरी समाजमान्य आहे.
थोडक्यात व्यक्ती स्वातंत्र्य नसल्याने (कमी असल्याने) आपणास असे साहित्य आपल्या भूमीत तयार होताना दिसत नाही.
*
कविवर्य राजा बढे यांची चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले ही कविता अर्थात आशा भोसले यांनी गायिलेले हे गीत नक्की कोण कोणास उद्देशून म्हणत आहे?
प्ऱ-आशा भोसले यांनी म्हटले आहे. रेकॉर्डरला बघुन म्हटले असावे. (मजेने घ्या)
*मनोरूग्ण अर्थहीन बडबड करीत नसतात, तेंव्हा उगाचच आपले अज्ञान पाजळून मनोरूग्णांचा अपमान करू नये. मनोरूग्ण नातेवाईक असताना आपल्या समाजातील आपल्यासारख्या लोकांमुळे आमच्यांसारख्यांना किती त्रास होतो याची आपल्याला कल्पना नसावी
*
मनोगत संघिष्ट आहे की नाही हा मुद्दा तितकासा सरळ नाही. मनोगतावर कुणीही आपले मत मांडू शकतो त्यामुळे ते एका विशिष्ट विचारसरणीचे म्हणता येणार नाही. येथे मते मांडण्यास सेन्सॉर शीप नसल्याने कुणालाही आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
मी मनकवड्याची बाजू घेत नसले तरी त्यांना तशी शंका का यावी हे समजू शकते. काही चर्चांवरून (फक्त चर्चेचा विषय नव्हे तर प्रतिसाद विचारात घेऊन) काही (बरेच)लोक हे "क्लॅनिश" विचार मांडतात. फक्त संघिष्ट असे नाव देण्याऐवजी आपण महाराष्ट्रीय व भारतीय लोक किती जास्त भेदभाव करणारे आहोत यावर चर्चा व्हावी, तसेच आत्मपरीक्षण व्हावे.
*आपली प्रामाणिकता आवडली.
मी पुन्हा एकदा हे लिहीत आहे. माझे काही चुकते आहे काय? मल तर जुने खाते बघता येते आहे. मी परवलीचा शब्द devanghevan वापरला तर मला जुने जीमेल खाते वापरता येत आहे. कृपया सल्ला द्यावा.
*http://www.manogat.com/node/6975
नमस्कार. आपला शेरा आणि इशारा अस्थायी आणि उगाचच ताणलेला आहे असे वाटत नाही काय?
कृपया एक क्षण तरी विचार करावात ही विनंती.