चर्चा करताना विषयाला लक्ष्य करण्यापेक्षा लेखकाला लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत आहे. एखादा विषय कसा कमकूवत आहे हे सांगण्यापेक्षा लेखक किती बावळट आहे / तो किती आढमुठेपणा करतो किंवा प्रतिसाद देणाराच स्वतःला शहाणा समजतो ह्यावरच वाद जास्त होतात. हळूहळू हि गोष्ट वैयक्तिक पातळीवर येते व आरोप प्रत्यारोप सुरू होतात.

याबरोबर टार्गेट/ करुन पळवणे हा प्रकार ही

तर मला वाटते की हा 'वैय्यक्तिक व कंपू' मुळे घडत असावा.  हे सर्वत्रच चालते. एकटा व मिळून हा फ़रक पडतोच...

जाता जाता (कुणी वाचत नसेल हेही आता गृहितकात आहे.)

चर्चा वाद करताना "पातळी दिसलीच, हे सिद्ध झाले आहेच, याना काय सांगणार/कळणार,आता चर्चा नको," वा तत्सम इतर टिप्पण्या वगैरे मत मांडताना समोर आहेत त्याबरोबरच वा माहितीतल्यांबरोबरच इतरही मनोगती या चर्चेत आहेत व त्यानाही मत आहे हे लिखित स्वरुपात टाकताना लक्षात घेणे हा  चर्चा विषयप्रधान होण्यास सहाय्यभूत होऊ शकते.