*मते मांडल्यावर अगर प्रतिसाद लिहिल्यावरचे 'ह. घ्या.', 'चूभूद्याघ्या', 'राग/गैरसमज़ नसावा' असे लिहिण्याची आता सवय झाली असली, तरी ही पाळीही अशाच प्रकारांमुळे आली की काय असे वाटते.

समोर व्यक्ति नसल्याने डोळ्यातले/शब्दोच्चारातले नाद व्यक्त होत नाहीत म्हणून असेल (*)चा फ़ायदा चिमटे काढण्यासाठी केला जातो की काय?

गर्दीत जसे हळूच कळ काढून बाजूस उभं राहून गम्मत पहायची असे काही मनोगती करतही असतील हो.

अंगाशी येणार हे माहिती म्हणुन आधीच खबरदारी की, 'ह  घ्या हं!' इ इ

चर्चा विभागापासून परावृत्त होत असावेत की काय असे वाटते.

आनंद मिळणार नसेल तर कां रहा हा विचार माझ्या सारखे इतरही करत असणार हे नक्की. हां, कुणालातरी आपला ईगो सुखावयाला मिळत असेल तर तसे होऊ दे... ज‍ो जे नव्हे 'तो' जे वांछील ते राहो .. असे होईल फ़ारतर