आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. या समस्येवर तोडगा काय किंवा आपण याबद्दल काय करू शकतो, हे मला सांगता येणार नाही. पण या गंभीर समस्येची दखल जेवढ्या तीव्रतेने राज्याने घ्यायला हवी होती, तेवढी घेतली गेलेली नाही हाच जयंतराव म्हणतात त्याप्रमाणे अस्वस्थ करणारा भाग आहे.
मिलिंदराव, मुक्त अर्थव्यवस्थेचे अंगीकार करत असताना कापसाला हमी भाव देणे हा विरोधाभास आहे हे मान्य. पण सद्यस्थितीत, धोरणातील तात्त्विक विसंगतीपेक्षा शेतकऱ्यांचा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे. शिवाय, विकसित देशही एका तोंडाने मुक्त अर्थव्यवस्थेचा जप करीत असताना, आपल्या देशातील शेतकऱ्यांना भरघोस सबसिडी देतातच की.
असो, या लेखाचा उर्वरित भाग येथे वाचता येईल.