आध्र प्रदेशात हैदराबादमधे
१) मराठी साहित्य परिषद (आंध्र प्रदेश), इसामिया बाजार, हैदराबाद ५०००२७ ही संस्था 'पंचधारा' हे त्रैमासिक प'काशित करते, तसेच इतरही पुस्तके प्रकाशित करते.
२) केवळ मराठीतून आणि मराठी या एकाच विषयाचे पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे "मराठी महाविद्यालय", डॉ. डावरे शाळा बिल्डींग, सुलतान बाजार, हैदराबाद ५००१९१ (फोनः ०४०-२४६५२६५५) वरील परीषदेद्वाराच गेली ४० वर्षे चालविले जात आहे. हे महाविद्यालय उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न आहे.
३) मराठी ग्रंथ संग्रहालय, इसामिया बाजार, हैदराबाद ५०००२७ (फोनः ०४०-२४६५३३७९ हे वाचनालय गेली ८४ वर्षे कार्यरत असून सध्या पुस्तक संख्या ३५००० व वाचक सभासद १२०० आहेत.