दाते यांचा 'महाराष्ट्र शब्दकोश" भाग ६ पृष्ठे अनुक्रमे २७९५(वानवासाठी) आणि २७९० (वाणसाठी) पाहिल्यास सर्व शंकांची उतरे मिळतील.

वानवा - 'अनिश्चितता, संदिग्धता, शंका' या अर्थाने संस्कृतमधिल 'वा न वा' वरून आलेला आहे, त्याचा प्रवास 'न्यून' शी संबद्ध नाही. "पावसाची वानवा असल्याने भारतीय शेती हा कयमच जुगार असतो." हा वानवाचा वाक्यात उपयोग.

वाण - 'न्यूनता, कमीपणा, उणीव, तूट' या अर्थाचा 'वाण' (कडे लक्ष द्या) हा शब्द आहे, तू संस्कृतातील 'न्यून' वरून > ऊन > उणा > वाण असा मराठीत तयार झाला आहे. "यंदा पाऊस भरपूर पडल्यामुळे शेतीला पाण्याची वाण नाही." हा आणचा वाक्यात उपयोग.

प्राध्यापकांवरचा तरुणरसिकाचा राग आता जावा.