शरदराव,
आपली मते स्वानुभवावर आहेत हे पकडून चालल्यास ती खरी म्हणावी लागतील. पण यात खूप सापेक्षता आहे. या वर नीलकांत यांनी अगदी विस्तृत लिहिले आहे आणि मला तरी ते १००% पटते.

एक मुद्दा असा आहे की आलिकडच्या काळात सामाजिक विचारा पेक्षा राजकीय स्वार्थ वाढला आहे. नवे राजकीय नेतृत्व पुढे येण्या ऐवजी घराणेशाही जास्त वाढली त्यांतून स्वार्थ, मग त्या घराण्याबरोबर राहून फायदा मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे कार्यकर्ते.  इथे तुम्ही म्हणता ते मुद्दे योग्य आहेत.

पण काही उदाहरणे आहेत. आता कुटुंब संस्था ही सुद्धा एक संघटना आहे. लग्न करताना आपल्या विचारांशी जवळीक असणारा जोडीदार निवडला जातो. मग त्यातला एकजण कुटुंब प्रमुख होतो शक्यतो त्याच्याकडे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचे क्षमता असते. जिथे मते पटत नाहीत वा स्वार्थ आडवे येतात तिथे ही संघटना तुटते. मग इथे मोठ्या संघटनेचे फायदे असतात आणि तोटे. तसेच छोट्या संघटने ही. पण संकट काळी मोठी संघटना बरेच असे फायदे देऊन जाते जे छोट्या संघटने मध्ये राहून नाही मिळत.

अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी मुले मुलाखतीत आणि सांघिक चर्चेत मागे पडतात या अनुभवाने मी पुढाकार घेऊन एक संघटना तयार केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळून बरेच मराठी विद्यार्थी चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवू शकले. आश्चर्याची गोष्ट अशी की संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली की आमच्या नोकऱ्या यांत्रिकी वाल्यांमुळे हातून जात आहेत. आमच्या नंतरच्या वर्गाने सुद्धा आमची मदत घेतली. आम्ही एक भीत्तीपात्रक सुद्धा सुरू केले होते. हे सगळे यशस्विरीत्या चालू राहिले होते.