वानवा - 'अनिश्चितता, संदिग्धता, शंका' या अर्थाने संस्कृतमधिल 'वा न वा' वरून आलेला आहे,

सहमत. मला जे काही थोडेफार संस्कृत आठवते त्याप्रमाणे संस्कृतमध्ये "च" ('आणि' या अर्थाने) व "वा" ('किंवा' या अर्थाने) ही अव्यये एकतर जे दोन शब्द अथवा शब्द समूह जोडतात त्या प्रत्येकाच्या शेवटी येतात किंवा दोन्हींच्या शेवटी एकदाच येतात. मराठींतील 'आणि' व 'किंवा' प्रमाणे मध्ये येत नाहीत. "दाता भवति वा न वा" हे गद्यांत लिहिले असते तर "दाता भवति वा न भवति वा" असे लिहिले गेले असते. पद्यांत असल्यामुळे "भवति" ची द्विरुक्ति टाळली असावी.