माझ्या कल्पनेप्रमाणे तराजूला एका बाजूला मुकुट व दुसऱ्या बाजूला तेवढ्याच वजनाची सोन्याची लगड  टांगून हवेमध्ये त्यांचे समान वजन आहे हे दाखवले. त्यानंतर दोन्ही पारडी पाण्यात बुडवली. मुकुटामध्ये खोट असल्यामुळे त्याचे घनफळ जास्त होते त्यामुळे त्याने जास्त पाणी बाजूला सारले, त्याचेवर उध्दरणाचे बल जास्त प्रमाणात पडले व तो वर उचलला गेला असे घडले असण्याची शक्यता आहे.  कारण इथे पाण्याच्या उध्दरणशक्तीचा उपयोग केला गेला आहे.