२) संघटना असत्याच्या पायावर निर्माण होतात, टिकतात व वाढतात.
असहमत शरदराव. अहो मुळात संघटना सत्याच्या किंवा खरेतर एखाद्या चांगल्या विचारावर निर्माण होतात. नंतर जसजशी संख्या वाढते तसे तसे त्यात अनेक प्रकारचे लोक येतात आणि उगमापाशी निवळशंख असलेली नदी गढूळ होत जाते. याला प्रामुख्याने असे लोक कारणीभूत असतात ज्यांना संघटनेची तत्वे समजण्याची कुवत नसते, पण ती आपणासच नेमकी कळली आहेत असा अहंकार असतो. त्यातच बहुधा ही मंडळी अधिक आक्रमक व प्रभावशाली संभाषण-कौशल्य (वक्तृत्व नव्हे) असलेली असली की त्यांच्या तथाकथित विचारांचा प्रसार अधिक होतो आणि हळूहळू मूळ तत्वे बाजूला पडत जातात. आपल्या देशातील बहुतेक चांगल्या (डाव्या आणि उजव्याही) संघटनांची हीच शोकांतिका आहे.
अर्थात काही संघटना मुळातच द्वेषमूलक वा विध्वंसक तत्वज्ञान घेऊन जन्माला येतात हे ही खरेच (धार्मिक संघटना या मूलतः अशाच असतात, कारण त्यांच्याकरवी विधायक कार्यापेक्षा बहुधा धार्मिक श्रेष्ठत्वाचे संघर्षच अधिक लढले जातात)
३) संघटना आकाराने व वयाने जितकी मोठी तितका तिच्यांत अधिक अप्रामाणिकपणा असण्याची शक्यता असते.
सहमत.
बाकी सत्य/असत्य हा सापेक्ष मुद्दा आहे. व्यक्ति-विचार-देश-कालातीत असे सत्य काही नसते असे माझे मत आहे. कलियुग वगैरे सुद्धा एक संकल्पना म्हणूनच अस्तित्वात आहे. त्याचा नेमका आरंभ निश्चित केलेला नाही त्यामुळे तो ही मुद्दा सोडून देतो.
- विचक्षण