नरेंद्र,
मला अध्यात्मात गती नाही. मानसशास्त्राची आवड असल्याने ह्या विषयावर थोडेफार वाचन झाले आहे. मराठीमध्ये मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची पुस्तके वाचनीय आहेत. त्यांचे लेटेस्ट  पुस्तक "विषाद-योग" रोजच्या जीवनात गीता कशी आचरावी यावर आहे. सुंदर लिहितात. जरूर वाचावे.

मानसिक आरोग्यामध्ये आणखी एक गंभीर समस्या म्हणजे उदासीनता (depression). यावर एक सुंदर पुस्तक मागे वाचले होते. फीलिंग गुड - लेखक डेव्हीड बर्न्स. चांगल्या किंवा वाईट भावनांच्या मागे तसे विचार कारणीभूत असतात या cognitive therapy वर हे पुस्तक आधारलेले आहे. आपले मूड स्विंग का होतात, ते होताना मेंदूमध्ये काय बदल
होतात हे सर्व सोप्या शद्बात समजावून दिले आहे. शिवाय बरेच छोटे प्रयोग आहेत जे आपल्याला सहज करून बघता येतात. must read.

अवांतर ः १५ दिवसांपूर्वी मला कळले की माझा रक्तदाब उच्च आहे. १७०/१४० हा आकडा  पाहिल्यावर बहुधा डॉक्टरांचा रक्तदाबही वर गेला. ः-)
ऍन्जियोग्राफी झाल्यावर डॉक्टरांनी निर्वाळा दिला की काही शारीरिक बिघाड नाही. नंतर लगेच तुमची लेखमाला वाचनात आली. खूप मदत झाली. लेखमालेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणखीही लिहावे.
आपला,
हॅम्लेट