कविवर्य विंदांची क्षमा मागून
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा तेच ते, तेच ते
तीच चर्चा, तोच वाद, तीच टीका, तीच दाद
तेच ठरलेले प्रतिसाद
तीच खाज, तीच खरूज, जातीचे ते उंच बुरुज
"कोंबडी पाप, भाजी पुण्य"
"भाजी पाप, कोंबडी पुण्य"
तेच दळण, तीच गिरणी
तेच पीठ, तीच चाळणी
मनोगताची तीच फाळणी...
तेच शंख, तेच नाद
पृथक पृथक / एक साथ