२. आपल्या हिंदू धर्मात 'मांसभक्षण' निषिद्ध मानले गेले आहे. (बहुतेक मत क्र. १ वरून)
इतके निरर्थक विधान आजवर कोठेही पाहिले नसेल.
म्हणजे आपल्याकडे traditionally मांसाहारी अशा कित्येक जाती-जमाती आहेत, त्या हिंदू नाहीत असे म्हणायचे आहे काय?
हिंदूधर्म ही 'काही ठराविक जातींची' मक्तेदारी आहे, असे यातून सुचवायचे आहे काय?
३. 'मांसभक्षण' केल्याने माणसाचा स्वभाव 'मांसभक्षक' प्राण्यांप्रमाणे चिडचिडा बनतो. कामवासना वाढते.
व्यत्यासाने, 'शाकाहार केल्याने मनुष्य बकरीसारखा निर्बुद्ध बनतो' असेही विधान करता येईल काय?
आणि बकऱ्यांची अनिर्बंध वाढणारी संख्या पाहता 'बकऱ्यांना कामवासना नसते' असे म्हणणेही धाडसाचे ठरावे.
(यात शाकाहारी लोकांना किंवा शाकाहाराला कमी लेखण्याचा कोणताही उद्देश नाही. ज्याला शाकाहार करावासा वाटतो, त्याने खुशाल शाकाहार करावा; फक्त त्याचे स्तोम माजवू नये, आणि शाकाहाराच्या समर्थनार्थ [किंवा केवळ मांसाहाराच्या विरोधाच्या उद्देशाने] वाटेल ती विधाने करू नयेत - The game can be played both ways - एवढेच म्हणणे आहे.
बकरी शाकाहारी असते. फक्त गवत खाते. दुसरे काही [म्हणजे निदान प्राणिजन्य पदार्थ तरी] खाऊन पचवू शकत नाही. परंतु गवत खात असताना समोर दुसरा एखादा प्राणी (जसे, कुत्रा वगैरे) मांसाचे लचके तोडत असला, तर 'बेंऽऽऽऽऽऽऽऽ! ती घाऽऽऽऽऽऽऽऽण!' असे कोणा बकरीने [नाक मुरडून] म्हटल्याचे ऐकिवात नाही. बकरी आणि शाकाहारी मानव यांच्यातला हा फरक चिंत्य आहे.)