ज्याला शाकाहार करावासा वाटतो, त्याने खुशाल शाकाहार करावा; फक्त त्याचे स्तोम माजवू नये, आणि शाकाहाराच्या समर्थनार्थ [किंवा केवळ मांसाहाराच्या विरोधाच्या उद्देशाने] वाटेल ती विधाने करू नयेत - The game can be played both ways - एवढेच म्हणणे आहे.

स्तोम माजवू नये हे बरोबरच आहे. पण ह्या चर्चेत कोणत्याही शाकाहारी व्यक्तीने असे स्तोम माजवल्याचे दिसले नाही. ही चर्चा सुरू करणारे महाशय मिश्राहारी आहेत असे त्यांनीच सांगितले आहे. त्यांनी मांसाहार करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे गृहीत धरल्यास आता मांसाहार योग्य की अयोग्य असा प्रश्न त्यांना पडू नये.