आर्किमिडीजने मुकुटातली भेसळ अशी शोधून काढली.

  1. मुकुटाचे हवेत वजन केले.
  2. तेव्हढ्याच वजनाच्या सोन्याचा तुकडा घेतला.
  3. पूर्ण पाणी भरलेल्या भांड्यात प्रथम सोन्याचा तो तुकडा पूर्णपणे बुडविला.  या वेळेला भांड्यातून पाणी बाहेर पडले ते जमा करून त्याचे वजन/आकारमान मोजले.
  4. पुन्हा पूर्ण भरलेल्या भांड्यामध्ये (त्याच वजनाचा) मुकुट बुडविला.  यावेळी भांड्यामधून बाहेर पडलेले पाणी जमा करून ते मोजले.
  5. दुसऱ्यावेळेला बाजूला सारलेले पाणी शुद्ध सोन्याच्या तुकड्याने बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजना/आकारमानापेक्षा जास्त होते.
  6. सोन्याचे विशिष्ठ गुरुत्व १९.३ आहे तर तांब्याचे ८.९ आहे. (चांदीचे ११.५)  म्हणजेच सारख्याच वजनाचा सोन्याचा तुकडा आणि तांब्याचा तुकडा घेतला तर तांब्याच्या तुकड्याचे आकारमान दुपटीपेक्षा थोडे अधिक भरेल.

यावरून मुकूट शुद्ध सोन्याचा नसून त्यांत दुसरा हलका धातू (बहुधा तांबे) मिसळले आहे हे आर्किमिडीजने सिद्ध केले.  पाण्याने पूर्ण भरलेल्या भांड्यामध्ये एखादा पदार्थ बुडविलातर त्यातून पाणी बाहेर सांडेल हे त्याला अंघोळीला स्नानपात्रात (टब मध्ये) शिरल्यावर लक्षात आले, म्हणून तो सापडले सापडले (यूरेका यूरेका) असे जोराने म्हणत निघाला.

उद्धरणशक्तीचे हे उदाहरण नसून आकारमानाचे आणि विशिष्ठ गुरुत्वाचे हे गणित आहे.

सारख्याच आकाराच्या पितळ्याच्या बांगड्या आणि शुद्ध सोन्याच्या बांगड्या हातात घेतल्यास सोन्याच्या बांगड्या जास्त जड लागतात हे जाणवायला तराजूचीसुद्धा गरज पडणार नाही. पितळे हा तांबे आणि जस्त यांचा मिश्र धातू (ऍलॉय) आहे.

निर्भेळ सोने हे अतिशय मऊ/लवचिक असते.  त्याला दिलेला आकार सहज बिघडू शकतो.  सोन्याला कणखरपणा येण्यास त्यात थोडे तांबे मिसळणे जरूर असते.  विशेषतः चांगली नाजूक टिकाऊ नक्षी करण्यासाठी तांबे हे मिसळावे लागतेच.  शुद्ध सोने (९९.९९९%) साधारण मुद्दाम घडविलेली ठेवीची नाणी, किंवा लगडी करण्यासाठी वापरतात.  त्याला २४ कॅरट म्हणतात.  साधारण भारतातले सोन्याचे दागिने २२ कॅरटचे असतात.   बहुतेक पाश्चात्य देशात सोन्याचे दागिने १४ कॅरटचे असतात.

असो माझे हे पाल्हाळ आता आवरते घेतो.

कलोअ,
सुभाष