प्रथम कुशाग्र आणि नंदन यांच्या मताशी मी सहमत आहे.

कामतांच्या लेखनाबद्दल माझे मत.

कामतांचे लेखन विशिष्ट चष्मा लावून लिहिल्याचे दिसते याचे कारण कदाचित कर्नाटक सरकाराने तसे घडवून घेतले असावे ही शक्यता नाकारता येत नाही.त्यांच्या लेखनात संदर्भांचा बराचसा अभाव आहे आणि तर्क शुद्धता कमी आहे.

 

मराठीने कोंकणीला काय किंवा  वर्हाडी ला वेगळे पणाची अशी काही वागणूक न देता त्यांनाही मराठीच मानले. त्यांमुळेच श्रावणबेळगावच्या लेखाला आणि महानुभाव पंथाच्या वर्हाडी लेखनासही आम्ही मराठीच म्हणतो.  शुद्धमराठीवरही कोंकणी लोकांचाच वरदहस्त स्पष्ट पणे रहात आला आहे.

 

कोंकणी मराठीची नव्हे तर असामी आणि बंगालीची भाषा भगिनी आहे. या तर्का करिता भाषाशास्त्रातील ग्राह्य संदर्भभाचा अभाव आहे.

कोणत्या भाषेतील जुन्यात जुने लेखन उपलब्ध होते ती भाषा अधिक जुनी ही अती तर्क दुष्टता आहे. महाराष्ट्रात आणि दक्षिणेत कोंकणात मानव प्राणी सारख्याचा काळात वावरले असावेत असे पुरातत्त्व पुराव्यांवरून वाटते.

लेखन करून घेण्यात संकेतळस्थळ स्वतःच कर्नाटक सरकाराचे नाव घेते.याचा सरळ संबंध बेळगाव वादातील महाराष्ट्र सरकाराने नाकारलेल्या महाजन अहवालास खरे ठरवण्याचा प्रयत्न असेल कारण बेळगावाच्या मराठी आणि कोकणी लोकांना महाराष्ट्र एकत्र मराठी म्हणून मोजते आणि महाजन अहवाले तसे न करता बेळगावाचे लोक कोकणी आहेत मराठी नाहीत असे सांगत महाराष्ट्राची मागणी फेटाळतो. यात कुठे सुसूत्र पणा जाणवतो. असे वाटते जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.