सुभाषराव,
आपण अत्यंत सुस्पष्ट रीतीने आर्किमिडीज़ने काय कृती केली (किंवा केली असावी) याचे वर्णन केले आहे यात शंका नाही.
शंका आहे ती ही की हा आपला अंदाज किंवा विचारांती झालेली धारणा आहे की याला काही विशिष्ट ग्रांथिक आधार आहे.
मी आतापर्यंत समजतो आहे की आमच्यापैकी कोणाकडेही तपशीलवार वर्णन उपलब्ध नाही आणि मी व कान्देरावांनी जे प्रतिपादन केले आहे ते सर्व केवळ अंदाज/कल्पना या स्वरूपाचे आहे. माझी स्वत:ची कल्पना आपण दिलेल्या कृतीशी जुळते. पण तरीही व्यक्तिश: मला कान्देरावांनी त्यांच्या शेवटच्या प्रतिसादात मांडलेली पद्धत अधिक आवडली.
तरीही जर ग्रांथिक आधार उपलब्ध असेल तर त्याविषयी माहिती करून घेण्याची तीव्र इच्छा आहे. सर्वांच्याच प्रबोधनासाठी हे सांगावे ही विनंती.
दिगम्भा