मुळात मनुष्यप्राणी हा सस्तन असून, त्याची अन्न पचवण्याची यंत्रणा (वि. आतड्यांची रचना) मांसभक्षणासाठी बनलेली नाही. त्यामुळे मनुष्याने मांसभक्षण करू नये.
काही ठिकाणी ऐकल्या वाचल्याप्रमाणे:
आपल्या शरीरातील ऍपेंडिक्स (मराठी?) चे काम कच्च्या वनस्पतीतील काहीं रसायनांचे(पदार्थांचे) पचन करण्यात मदत करणे असे होते. कालांतराने त्याचे ते कार्य कमी झाले. आणि ऍपेंडिक्स हा फक्त नाक्रियाशील भाग म्हणून शरीरात राहीला. (ईवोल्यूशन-evolution) ह्यामागील कारणही मला पूर्ण शाकाहार नसणे हे वाटते.
असेच ऐकल्याप्रमाणे पचनसंस्थेप्रमाणेच माणसाचे दात ही फक्त शाकाहार करण्यासाठीच आहे. पण दुसरीकडे ऐकल्याप्रमाणे, माणसाच्या दातांची संरचनाही दोन्ही प्रकारचे खाणे खाण्यासाठी आहे. समोरील दात धारदार (पदार्थ तोडण्यासाठी) आणि मागील दात सपाट (खाणे बारीक करण्यासाठी). ही रचना मांस खाण्यासाठीही असेल.
'मांसभक्षण' केल्याने माणसाचा स्वभाव 'मांसभक्षक' प्राण्यांप्रमाणे चिडचिडा बनतो. कामवासना वाढते.
असहमत.
नकळत 'मांसाहार' केल्याने काही पाप होत नाही.
काही माहित नाही. परंतु मी कोणाला काही पदार्थ देताना बघतो की त्यात अभक्ष्याचा अंश तर नाही. असल्यास समोरच्याला विचारतो की तुला चालते का? चला, मी दोघांनाही पापापासून दूर ठेवतो.;)
'मांसभक्षण' करणे जसे पाप किंवा तत्वाविरोधी आहे तसेच 'मांस' असलेल्या वस्तू (Lipstick- माश्यांच्या खवल्यांचा अंश, चामड्याच्या वस्तू, कपडे) यांचाही 'शाकाहारी' मंडळींनी निषेध केला पाहिजे. उगाचच आम्ही 'मांसभक्षण' करत नाही अशा बढाया मारू नये.
सहमत.माझ्या ओळखीचे काही लोक ह्यांचा वापर टाळतातही.
बऱ्याचदा वैद्य (डॉक्टर, मनोगती वैद्य नव्हे) अशक्त व्यक्तींना चिकन खाणे किंवा चिकन सूप पिण्याचा सल्ला देतात.
अहो, डॉक्टरच काय पण आपल्या प्राथमिक/माध्यमिक शाळेतही आपल्याला विज्ञानात शिकविले होते की मांसांत कॅलरी/जीवनसत्वे मिळतात. अर्थात मांसाहार हा चांगला असतो.
ह्यावर माझा प्रश्न आहे की जर बहुतेक लोक म्हणतात त्याप्रमाणे जर मांसाहार चांगला नाही आणि आपले शरीर त्याकरिता नाही तर मग ते शाळेत का शिकवावे? त्यावर बंदी का नाही ? मांसाहाराचे दुष्परिणाम सांगणारे( उदा. इस्कॉनमधील प्रचारक) त्याकरीता का नाही काही करत? कारण जर लहानपणीच जर अशा गोष्टींसाठी प्रेरीत केले असेल तर मग मोठेपणी त्यावर वेगळे ज्ञान देऊन काय फायदा?
नाहीतर आपण 'उपद्रवी' म्हणून किड्यामुंग्याचा जीव घेतच असतो की.
माझ्यामते हा मुद्दा ह्या चर्चेत येऊ नये. कारण इथे खाण्याची चर्चा आहे असे मला वाटते. किडेमुंगी आपण मारून खात नाही. (अपवाद: चीनी लोक)
मनोगत वरच वाचल्याप्रमाणे एक प्रतिसाद होता की जर मी खात नाही तर मला उगाच ते खाण्याबाबत सांगणे चांगले नाही.
सहमत. मी नाही सांगत. पण जर का मी काही मांस खात असेल तर ते न खाण्यासाठी उगाच शरीराची रचना, धर्म, पाप, मुके प्राणी असे काही सांगत असेल तर मात्र मी नक्कीच त्यांना उत्तर देतो.