लेखाच्या उत्तम अनुवादाबद्दल धन्यवाद, नंदन.
मला वाटते, शेतकऱ्यांना 'ही परिस्थिती बदलू शकते. आमदार लोक काही करू शकतात.' याची माहितीच नाही. नेतेमंडळी बरी असतील तर ती स्वतःहून काही करतील. तशी शक्यता किती? जोवर कोणी काही मागत नाही, आवाज, दंगा करत नाही तोवर काही कृती होणार नाही. आणि इथे आपण (देशा-परदेशात राहणारे शहरी मध्यमवर्गीय) दंगा करून काही उपयोग नाही. काही करायचेच म्हटले तर जिथे प्रश्न आहे तिथे जाऊन करायला हवे. प्रसारमाध्यमे इतक्या करूण, हेलावणाऱ्या गोष्टींना 'कव्हर' का करत नाहीत याचे आश्चर्य वाटते.