फक्त अशी कल्पना करा की अनेक माणसांना एका पिंजऱ्यात कोंबून ठेवले आहे. तुम्ही त्यापैकी एक आहात. दुकान लावले आहे. बाहेर त्यांच्या मांसाचा दर दर्शवणारी पाटी आहे.

 एक माणसाहून प्रगत अशा जातीतील खाटीक धारदार सुरा घेऊन बसला आहे. एवढ्यात  सुधारित जमातीतील काही भक्षक प्राणि येतात. एखाद्याला पसंद करतात. याला कापून द्या. मग तो राक्षस एकाला पायाला , मानेला वा कुठेही धरून पकडतो. तो माणुस ओरडतोय, किंचाळतोय. पण त्याला दया येत नाही.  कदाचित तो "भाग्यवंत" तुम्हीच असता. तुमच्या गळ्यावर तो धारदार सुरा ठेवून एकाच फटक्यात तुमची मान उडवून देतो. तुमचे उर्वरित शरीर एका ड्रमात थोडा वेळ तडफडते. मग सर्व काही शांत. त्याच शांपपणे तो तुमच्या शरीराचे बारीक बारिक तुकडे करून पिशवीत पार्सल करून देतो.

तो सुधारित प्राणि घरी जाऊन माणूस नावाच्या प्राण्याचे मटण ओरपतो. 

तो आपल्यापेक्षा सुधारित प्राणी आणि सध्याचे आपण यात काय फरक आहे?