किंवा अशी कल्पना करा ना की तुमचे ते सुधरित प्राणी माणसांची शेती करतायत, त्यासाठी खास शेतं बनवलीत, एखाद्या फळभाजीसारखी माणसे वाढवली ,तोडली , कापली जातायत.
का फक्त मांसाहारी खातात त्या प्राण्यांना जीव असतो आणि शाकाहारी खातात त्या झाडावेलींना जीव नसतो? मला तर वाटतं गहू, तांदूळ इ. गोष्टी बीजरुपांत सेवन करणे हे भ्रूणहत्येसारखेच महाभयानक पातक आहे. त्या बिचाऱ्या भाताच्या रोपट्याच्या आपल्या दाण्याकडून किती अपेक्षा असतील! एखाद्या झाडाची फळे तोडून खातो तसं कुणी आपले हातपाय तोडून खायला घेऊन गेलं तर? किंवा झाडावरची फुले तोडून आपण देवाला अर्पण करतो तसं या सुधारित प्राण्यांनी आपले कान- नाक तोडून त्यांच्या सुधारित देवाला वाहिले तर?
जाऊदे ,वरिल विचारांनी उद्विग्न होऊन आजपासून मी फक्त जीवजंतूरहित हवा आणि पाणी सेवन करून जगण्याचा विचार करतेय.
साती