जाऊदे ,वरिल विचारांनी उद्विग्न होऊन आजपासून मी फक्त जीवजंतूरहित हवा आणि पाणी सेवन करून जगण्याचा विचार करतेय.

... आणि मीठ!

मला तर वाटतं गहू, तांदूळ इ. गोष्टी बीजरुपांत सेवन करणे हे भ्रूणहत्येसारखेच महाभयानक पातक आहे. त्या बिचाऱ्या भाताच्या रोपट्याच्या आपल्या दाण्याकडून किती अपेक्षा असतील! एखाद्या झाडाची फळे तोडून खातो तसं कुणी आपले हातपाय तोडून खायला घेऊन गेलं तर?

...आणि आपण दाणे, कणसं भाजून खातो तसं कोणी आपल्या मुलाबाळांना भाजून खायला लागलं तर?

पानांद्वारे वनस्पती श्वासोच्छ्वास करतात. आपलंही नाक तोडून जर कोणी ('ती घाऽऽऽऽऽऽण!' न म्हणता!) पालेभाजीसारखं खाऊ लागलं तर?

Emotional argumentsसारखं दुधारी तर जगात दुसरं काही नसावं!

- टग्या.