चित्तोबा,

तशी बऱ्याच अवयवांची शेती आजकाल प्रयोगशाळेत 'उतीसंवर्धन' तंत्र वापरून करता येते.  अवयव कशाला हळूहळू अख्खा माणूसच तयार करता येईल की प्रयोगशाळेत.(क्लोनिंगने नव्हे हो, ते तंत्र थोडे वेगळे.)

'खाण्यापिण्याच्या सवयींवरून काळजाच्या व्हरायट्या' - कल्पना मजेशीर आहे. :) :)

टग्या म्हणतात तसे - प्रश्न भावनिक पातळीवर नेला की काही वाद-प्रतिवाद राहातच नाही.

बाय द वे काही वर्षांपूर्वी मंदार मोडकांच्या कल्पनेवर आधारित कथा "वी इट पिग (की पोर्क); डोंट वी?" वाचल्याचं आठवंतय.

                                                                साती काळे.