कोंबड्या स्थलांतर करीत असतात काय? कोंबडी स्थलांतर करणारा पक्षी नाही (मायग्रेट्री बर्ड) नाही असे वाटते.
चित्तोपंत,
हल्ली असं बहुधा काही राहिलं नसावं. उदाहरण सांगतो.
"कॅनडा गूज़" नामक एक बदकसदृश परंतु वर्णानं थोडा वेगळा, साधारणतः मोरपंखी रंगाचं डोकं असलेला पक्षी असतो. हा स्थलांतराच्या patternप्रमाणे कॅनडाहून काही काळाकरता दक्षिणेस / अटलांटाला येतो, आणि ऋतुमान बदलले, की कॅनडास परत जातो. निदान अशी थिअरी आहे.
प्रत्यक्षात हा पक्षी अटलांटातून परत गेलेला मला कधी दिसलेला नाही. कधीही पहा, स्थानिक असल्यासारखा दिसतोच. आणि थव्यानं! (तशीही अमेरिकेत तात्पुरतं म्हणून आलेलं कोणीच परत जात नाही - आणि बरोबर/पाठोपाठ आपलं खानदान घेऊन येतात - अशी जन्मसिद्ध अमेरिकनांची कायम रड असतेच. कोंबडीताईंचा अपवाद सोडा!)
आणि तसं पाहिलं तर 'मायग्रेटरी' म्हणवणारा कॅनडा गूज़ जर स्थलांतर करत नाही, तर मग त्याच्या बदल्यात 'मायग्रेटरी' न म्हणवणाऱ्या कोंबडीनं जर स्थलांतर केलं, तर बिघडलं कुठं? उलट फिट्टंफाट झाली, असंच म्हणेन मी!
- टग्या.