खरं तर याचा मांसभक्षणाशी अर्थाअर्थी संबंध नाही, पण ('माणसांना एखाद्या आणखी प्रगत प्राण्याने काबूत आणून आज माणसं प्राण्यांना वागवतात तसं वागवलं तर' या, मंदाररावांच्या) कल्पनाबीजाचा विस्तार चाललाच आहे, आणि शेतीचाही विषय निघालाय, तर (शेतीतलं मला काही कळत नाही, पण) शेतीला बैल लागतात, आणि बैल आणि वळू यांच्यात काही फरक असतो, असं काहीसं ऐकून आहे... जाऊ दे!
तस्मात् शेतकरीबंधूहो, शेतीसाठी (आणि गायीबैलांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी) ट्रॅक्टर वापरा!
आणि अहिंसेच्या कारणासाठी शाकाहाराचा पुरस्कार करणारे* बंधूहो, पुढच्या वेळी तो चपातीचा तुकडा मोडण्यापूर्वी (तो भाताचा घास तोंडात घालण्यासाठी उचलण्यापूर्वी) ती चपाती (तो भात) ज्या गव्हापासून बनलेली आहे (ज्या तांदळापासून बनलेला आहे), तो गहू (तो तांदूळ) अहिंसक मार्गाने उगवला गेला आहे का, याचा विचार करा!
- टग्या.
*कोणी कोणत्या कारणासाठी शाकाहार किंवा मांसाहार करावा, हा ज्याचात्याचा खाजगी प्रश्न आहे. जोपर्यंत कोणी दुसऱ्याच्या आड येत नाही, तोपर्यंत काहीच म्हणणं नाही. पण एकदा का जाहीर पुरस्कार सुरू झाला, की प्रत्युत्तरादाखल असलीही आर्ग्युमेंटं ऐकायला मिळणारच - नाइलाज आहे. जसा सवाल, तसा जवाब!