माझ्यासाठी ही केवळ निरर्थक चर्चा आहे. कोणी काय खावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. उगाच स्वतःच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ आपलंच मत कस खरं आहे हे चघळण्यात काय अर्थ आहे?
१३. थंड प्रदेशांमध्ये 'मांसभक्षण' करून शरीरात ऊब आणता येते. म्हणून तेथे 'मांसभक्षण' केलेच पाहिजे.
थंड प्रदेश अनेकदा बर्फाच्छादित असल्याने शेती करिता जमीन आणि पूरक वातावरण मिळणे अवघड आहे. या भागात लोकसंख्येची घनता कमी असल्याने मनुष्यबळ आणि जमीन यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे या भागात आणि या भागातल्या लोकांसाठी शेती मला अव्यवहार्य वाटते.
असाच भारतात दारू/अल्कोहोल मिश्रीत पेयांचे समर्थन कितपत योग्य हा सुद्धा एक चर्चेचा विषय बनू शकतो.