नरेंद्र,

अँजिओग्राफी  म्हणजे सलाइन लावताना जसे इंजेक्शन देतात तसे देउन त्यातून डाय इंजेक्ट करतात. नंतर फ़क्त सीटी स्कॅन करतात. यामधे शारीरिक त्रास अगदी कमी होतो. यात शारीरिक क्षती म्हणजे हाताला पडणारे अगदी छोटेसे  छिद्र. याउलट अँजिओप्लास्टीसाठी शरीराचा मोठा छेद घ्यावा लागतो कारण धमनी रूंदीकरण करण्यासाठी धमनीमध्ये उपकरणे घुसवावी लागतात.

धमनी आकुंचन पावली आहे की नाही हे दुसऱ्या कुठल्या उपायाने शोधता येते की नाही हे मला माहीत नाही. माझ्या मते जास्त त्रास न होता उत्तर मिळाले त्यामुळे हे आवश्यकच होते.

हॅम्लेट