गौरी-गणपतीला मांसाहारी नैवेद्य चालतो असे लोकांनी दर्शविले आहे. तसेच वृत्तपत्रातला लेख याकरता उदाहरणादाखल दिला आहे. त्याच्याबद्दल मी हे लिहीत आहे.
सर्वसाधारण महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर हिंदू मांसाहार करतात. (वारकरी सोडून). ब्राह्मणांना तर रिती-भातीने मांसाहार वर्ज्य आहे.
हे जेवणात मांसाहार करणारे बहुधा श्रावण महिन्यात मांसाहार करीत नाहीत. यास २-३ कारणे आहेत/होती. मुख्य म्हणजे श्रावण महिना पावसाचा असल्याने समुद्रावरची मासेमारी बंद असत असे. तसेच यावेळेला शेतीची कामे अगदी हातघाईची असतात. तसेच वातावरण थंडी आणि ओलाव्याचे असल्याने पोटाच्या विकारांचा (पटकी, अतिसार वगैरे) प्रादुर्भाव असतो. या सर्वांचा विचार करून श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याची प्रथा पडली. तसेच श्रावण संपल्यावर लगेचच गणपति येत असल्याने मांसाहाराची सुरुवात गणेशचतुर्थी होईपर्यंत होत नाही. बहुतेक लोक ऋषिपंचमी होऊन गेल्यावरच मांसाहार सुरु करतात.
या मुळे श्रावण महिन्यात (आणि गणपति होईपर्यंत) मटणाचे/कोंबडीचे भाव बरेच उतरतात हे त्यावेळेला मांसाहार करणाऱ्यांच्या लक्षात येत असेल.
गौरी-विसर्जन हे साधारण भाद्रपद शुद्ध सप्तमीनंतर होते. तेव्हा त्यावेळेला नैवेद्य मांसाहाराचा असू शकतो, पण गणपतीला नव्हे.
अर्थात काहीहि बंधन न मानणाऱ्यांसाठी यातले काहीच लागू होत नाही.
ब्राह्मणांनातर मांसाहार निषिद्ध होताच पण त्याशिवाय चातुर्मासात (आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत) आणखी कित्येक पदार्थ वर्ज्य होते. उदा. कांदा, लसूण, वांगी, वगैरे. शिवाय चातुर्मासातले नेम (नियम) असत.
कलोअ,
सुभाष