हॅम्लेट,

अँजिओग्राफी केवळ प्रमुख धमन्यांतील मोठे अडथळेच उजेडात आणू शकते.
जेव्हा मोठ्या वाहिन्या अवरुद्ध असतात तेव्हा इतरही सर्वच वाहिन्यांमधून कीटण साखळलेले असते. त्यांचे निदान अँजिओग्राफीने होत नाही. कार्टोग्राफीने ते होऊ शकते. शिवाय कार्टोग्राफी अनातिक्रमक आहे.

तेव्हा रिनल अँजिओग्राफी करण्याचीही खरोखरीच आवश्यकता होती काय?

ह्या प्रश्नाचा अभ्यासाकरितातरी अवश्य शोध घ्या. ही विनंती.

कदाचित मूत्रपिंडांवर रक्तदाबाचा झालेला परिणाम मापण्यासाठी तुमची रक्त, मूत्र आणि श्राव्यातीत ध्वनी चाचण्या ह्याआधी झालेल्या असण्याची शक्यता आहे. अर्थातच ही माहिती व्यक्तिगत स्वरूपाची आहे. आणि ती वाटून घ्यायची की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मात्र हल्ली अनावश्यक, अतिक्रमक चाचण्या करवून घेण्याचा कल दिसून येतो. त्यास आळा घालण्याकरता अशा स्वरूपाच्या माहितीचा प्रसार हेच साधन प्रभावी आहे. असे माझे मत झालेले आहे.