कट्ट्यावर येणारी आम्ही माणसे (परीक्षार्थी मराठीच असतात) परीक्षेतली ऑब्जेक्टीव प्रश्नांची विदाऊट ऑब्जेक्टीव उत्तरे देतात युपीएस्सीच्या परीक्षेतल्या प्रमाणे.
मनोगत चर्चा हा एक आभासी कट्टा नाही काय,कट्ट्यावर जे सर्व होत ते इथे व्हावे नाही काय? हां आता 'आभासी' कट्टा असल्या मुळे मोठ्यांना मोठेपण मिळत नाही हे खरे पण नाण्याची दुसरी बाजू वय लपवता येते नाही का ? आणि खासगीपणा पण जपता येतो. म्हणजे प्रसिद्धी वलयांकीत लोकांना पण स्वतःचे नाव लपवून मनोगतीत बेमालूम मिसळून जातायेते.म्हणजे कुणी दबून चर्चा करत नाही हा एक फायदा. तर आपणां सर्व थोर प्रथित यश मराठमोळ्या मंडळींना पा.पा. चा सादर प्रणाम व चर्चांचे वारू शक्यतेवढे भरकटूद्या आमच्या पदरी अमाप पा.पा. देऊन आम्हांस मनोगतावर चिरंजीव करा हि नम्र विनंती.
आपला
पाला पाचोळा
ता.क.
तृण्रसिक, खिडकी च्या टूल ऑप्शन च्या आत जा,फ़ाईली आणि कुकींना
डि.लिट. पदवी द्या ,नंतर पेज रिफ्रेश करा प्रतिसाद उघडा.