सर्वसाक्षी, सुंदर लेख!
या आत्मबलिदानाला आत्महत्या किंवा गुन्हा म्हणण्याचे काही कारणच नाही . या न्यायाने लोक उद्या ज्ञानेश्वरांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत समाधी घेतलेल्या सर्व थोर मंडळींवर केशी घालतील कोर्टात!
की मरेपर्यंत उपोषण केले तर ते दोषी आणि उपोषणाचे बार अधून मधून उडवूनही जीवंत राहाणारे महान?
आणि हो, कोणत्याही उच्च ध्येयासाठी आत्मबलिदान करणारे ते महानच आहेत. वैयक्तिक कारणासाठी मृत्युला कवटाळणारे पराभूत, भ्याड असतील कदाचित पण गुन्हेगार नक्कीच नाहीत. (या विषयावर वेगळी चर्चा सुरू करा, तिथे आणखी लिहेन.)
साती काळे.