पण इथे जुने मराठी तिखट पदार्थ किंवा त्यांच्या पाककृतींविषयी काहीच माहिती नाही.

मी मनोगतावर 'मिरची' हा शब्द टाकून शोध घेतला तेंव्हा ही चर्चा लगेच सापडली नाही. लिखाण लिहून सुपूर्द केल्यावर ''ह्यावरून आठवले '' मध्ये ही चर्चा दिसली.ही चर्चा वाचून माझ्या अल्पमतीत विशेष भर न पडल्याने नव्याने चर्चा चालू केल्याने काही चूक केली असेल असे वाटत नाही.

तसेच या चर्चेनिमित्त अगदी प्राचीन पाककृती पुढे आल्या तर आवडतील. जुन्या चर्चेत मनोगतावरील पाककलेतील जाणकार मंडळींनी काहीच मत व्यक्त केले नाही .

ज्यांना इच्छा असेल त्यांनी या चर्चेत भाग घ्यावा. उरलेल्यांनी एखाद्या चर्चेत घुसून आपलंच घोडं पुढे दामटणारे असंबद्ध वाद चघळायला हरकत नाही. प्रशासकांना वाटले तर ते ही चर्चा उचलून संजोप रावांच्या चर्चेला जोडतील.

                                                               साती काळे.