नीलकांत  यांनी मराठी आणि संगणक क्रांती हा प्रस्ताव मनापासून लिहिला,'अपशब्दांचा संग्रह असावा ' हा विषय चघळला गेला त्यांस पण मान डोलवली, आम्हीही अपशब्दांचा उपयोग भाषा समजण्यास होतो ह्या बद्दल आम्ही फक्त सहमतच नाही तर असे संकेतस्थळ उपलब्ध झाले तर त्यात दोन शब्दांची भरच घालू.

आम्ही बालपणा पासून तथाकथित अपशब्द प्रमाणभाषे सारखे वापरतच मोठे झालो.मोठे झाल्यानंतर  आमच्या डोई जी शिंगे फुटली आणि हा वापर खुंटला.त्यात नवीन मानसशास्त्राचे 'योग्य वयात अधिकृत आणि योग्य लैंगिक शिक्षण न मिळता-बालपणी मिळणारे (अप)प्रमाणभाषेतून  लैंगिक गैरसमज पसरतात असे खोटे बोधामृत  मिळाल्यामुळे आम्ही  मुलानं लैंगिक शिक्षणतर देत नाहीच पण अपशब्दापासून स्वतः दूर राहिल्या मुळे मुलांचे लैंगिक शिक्षणही थांबते. आपणा सर्वांच्या सूचनांशी आम्ही सहमत असून अशा संकेतस्थळाची मनापासून वाट पाहत आहोत असे जाहीर मनोगत व्यक्त करतो.

चु.भु.दे̱̱.घे.

आपला मनस्वी पालापाचोळा.