ब्राह्मणांनातर मांसाहार निषिद्ध होताच पण त्याशिवाय चातुर्मासात (आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत) आणखी कित्येक पदार्थ वर्ज्य होते. उदा. कांदा, लसूण, वांगी, वगैरे.  शिवाय चातुर्मासातले नेम (नियम) असत.

हे गुजराती, मारवाडी यासारखे अनेक लोक पाळतात. हे केवळ ब्राह्मणांना लागू होते असे नाही. कुठल्याही जाती धर्मातील व्यक्तीला लागू होते. आणि त्याचे कारणही तुम्हीच वर  लिहिले आहे. हे पदार्थ पचायला जड असल्याने आणि पावसाळ्यात हवामानामुळे विकार उद्भवू नयेत म्हणून हे पदार्थ खाऊ नयेत असा संकेत होता. कांदा हा मुळातच थंड आणि पावसाळ्यात कांद्यावर बुरशीसदृश पदार्थाचा काळ्या रंगाचा थर चढतो. तसेच वांग्यात बऱ्याचदा अळ्या सापडतात. त्यामुळे शक्यतो हे पदार्थ खाऊ नये असे आहे. लसूण का वर्ज्य हे मात्र समजत नाही. पावसाळ्यात हे सगळे न खाणारे ब्राह्मणेतरही पाहण्यात आहेत.