जतीन दासांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर्वसाक्षी. ही गोष्ट (उपोषणाची) लहानपणी 'अग्निफुले' किंवा तत्सम शीर्षकाच्या एका पुस्तकात वाचली होती. तेव्हा '६३ दिवस! सॉलिडच आहे!' अशी अनुप्रमाणे प्रतिक्रिया झाली होती. जतीनदांच्या स्मृतीस मनःपूर्वक अभिवादन.

या गोष्टीतून त्यांच्या उपोषणाचे साध्य (goal) काय होते ते स्पष्ट झाले नाहीये. तुरुंगातील अधिकाऱ्यांची वागणूक, गुन्हा सिद्ध न झालेल्या कैद्यांवर होणारे जुलूम यांच्याविरुद्ध हे उपोषण होते असे काहीतरी आठवते. मला वाटते स्वतंत्र भारतातही हे कायदे (आणि वागणूक) तसेच आहेत.

------

वैद्यबुवांनी माडलेल्या मुद्द्यांचा विचार करते आहे.

क्रांतिकारकांचे गोडवे गाताना, एका महात्म्याची निंदा

मला वाटते नव्या धोरणांत, इतिहासात २, ३ इतिहासपुरूष, महात्मे फक्त आणि बाकी अंधार असे काहीसे चित्र रंगवले आहे. त्याचा प्रतिवाद, प्रतिक्रिया म्हणून असे उल्लेख होत असावेत.

------

सरफरोशी की तमन्ना या गझलेत, 'खेंच कर लायी' ओळीत एक अक्षर कमी पडते आहे आणि 'एक से करता नही' मध्ये एक जास्तीचे आहे! म्हणताना अडखळले. 'रहरवे-राहे-मुहब्बत ..' मधला अनुप्रास मस्त आहे.