चहा हा शब्द चिनी भाषेतून आला आहे. चहा करता चिनी भाषेत असलेले अक्षर (चित्र) हे चीनच्या वेगवेगळ्या प्रांतात "टे-ते" आणि "चा" असे उच्चारले जाते. त्यावरून जगात दोन प्रकारची नावे चहा करता आहेत. पैकी इंग्लिश आणि बहुतेक पश्चिम यूरोपी भाषांमध्ये T उच्चाराची जवळिक आहे. आशियायी आणि पूर्व युरोपी भाषामध्ये Cha या उच्चारापासून आलेली नावे आहेत. अर्थात मराठीमध्ये याच उगमातून चहा हा शब्द आला आहे.
茶, विकिपीडियाचा दुवा इथे आहे तो अधिक माहितीसाठी बघू शकाल.
कलोअ,
सुभाष