लेख धारदार आहे. निसर्गाचा अनाकलनीय प्रकोप, राज्यकर्त्यांची उदासीनता आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली अगतिकता, कुचंबणा मन हेलावून टाकणारी आहे.
परंतु, मन विदीर्ण करून टाकणाऱ्या कथेला, अहवालाला जे चित्र वापरले आहे ते अत्यंत अयोग्य आहे, असे वाटते.
वयोमानानुसार वृद्धत्वास पोहोचलेल्या म्हातारी (कुपोषित वाटत नाही) समोरच्या हिरव्यागार शेतात धष्टपुष्ट बैलजोडी, आणि धष्टपुष्ट शेतकरी हे लेखातील भयानक वास्तवाशी मेळ खात नाही. म्हातारीला जुने 'सुगीचे' दिवस आठवताहेत असे दर्शवायचे असले तरी चित्र अयोग्य वाटते.
फक्त हाडे आणि त्वचा उरलेली म्हातारी अथवा म्हातारा, उजाड शेत, निष्पर्ण वृक्ष, मरून पडलेला बैल, त्याच्या जवळ एखादे गिधाड आणि वर प्रखर सूर्य असे चित्र लेखातील वास्तवास उठाव देणारे ठरले असते. असो.
भाषांतर आणि त्यामागील उद्देश चांगला आहे.