पूर्वपद,
नीलकांतांचे मराठी आणि संगणक क्रांती सारखा महत्त्वपूर्ण विषय हाताळण्या बद्दल तसेच मराठी विकिपीडियाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.
(आमच्याच विकिवरील सवंगड्यांकडून) झालेले विषयांतर टाळून विषय पूर्वपदावर येण्याच्या दृष्टीने आतापर्यंत विषयाला धरून झालेल्या चर्चेचा थोडक्यात खालीलप्रमाणे आढावा घेतो:
*निलकांतांच्या मूळलेखा शिवाय आढावा घेण्यासारखा विषयाला धरून एकही प्रतिसाद कसा नाही? खरेच मूळ चर्चा विषय रटाळवाणा(निलकांतांची क्षमांमागून) वाटतो, का अभयरावांचे विषयांतर साऱ्यांना एवढे भावले?
आता विषयाकडे (विषय शब्दात विष शोधू नये ही नम्र विनंती):
*मराठी समाज संगणक क्रांतींमध्ये खूप पुढे आहे. मात्र मराठी खूप मागे. -सहमत
*सॉफ्टवेअर आणि जमल्यास समग्र चालना प्रणाली मराठीत असावी -सहमत.
- यात ऑपरेटिंग सिस्टिम , ब्राउझर प्राधान्याने मराठीत वाचनीय उपलब्ध व्हावेत असे वाटते.
*मराठीच्या भाषांतरनासोबतच त्याचे प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे-सहमत
- देवनागरीचा संगणक कळ/कुंजीपट-कीबोर्ड- आणि रूपांतरण प्रणाली-ट्रांसलिटिरीएशन- याचे आखील भारतीय स्तरावर प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे (आजच्या अनास्थेच्या काळात हे एक मोठे आव्हानच ठरावे)
- मराठीकरण करणारे व भाषांतर करणारे यांच्या करिता दर्जेदार पारिभाषिक शब्दांची उपलब्धात वाढायला हवी हि जाणीव सर्वां ठायी दिसते.पण हे प्रयत्न काही वेळा चाकाचा पुन्हा शोध लावल्या सारखे झाले आहेत,पूर्वी पासून जे पारिभाषिक शब्द उपलब्ध आहेत त्यांची महाजालावर-इंटरनेटवर -उपलब्धता तर नाहीच, मी अशात पुण्याच्या अप्पाबळवंत चौकात अशा पुस्तकांचा शोध घेतला तर तिथेही हि पुस्तके उपलब्ध नाहीत -व दुकानदार 'पारिभाषिक' याच शब्दाचा अर्थ नसम्जल्या सारखे भुवया उंचावून पाहतात हे वेगळे-
- स्वयंभू भाषांतर प्रणाली तयार होणे हि पण प्राथमिकता आहे .या बाबत सध्या उपलब्ध प्रणाली चा वापराचे संकेत स्थळ.
- स्वयंभू भाषांतर प्रणालीस मोठ्या प्रमाणांवर पारिभाषिक शब्द गरज पडेल तसे महाजालावर बनवण्याचा उपक्रम सुदृढ व्हायचा असेल तर संस्कृत,मराठी भाषांचे व्याकरण,शब्दकोश विकिपीडियासारख्या संकेतस्थळावर सहज उपलब्द्ध व्हावे , फक्त शुध्दाशुध्दतेचे नियमपुरेसे नाहीत. आणि या उपक्रमात प्रत्येकाला सहज सहभाग नोंदवता येतो पण सध्याचा आमचा उच्चारासह पाहिले तर कठीण वाटते.
आणि हे समजणे गरजेचे आहे की या सहभागात आपण सर्व हात राखून राहिलो तर मराठीचे अस्तित्व एका बोलीभाषे एवढेच उरेल.