श्री. हॅम्लेट आणि नीलकांत,

पहिले ३ प्रश्न त्या गायनातल्या गीताच्या शब्दाबद्दल आहेत.  त्याबाबत मी लिहीत नाही.  चवथा प्रश्न शास्त्रीय संगीत शिकण्याबाबत आहे त्या संबंधी थोडे मी सांगू शकतो.

शास्त्रीय संगितावर मनोगतामध्ये खूप चर्चा झाल्या आहेत.  हा विषय पटकन समजावून सांगता येण्यासारखा नाही.  तुम्ही ऐकत राहा.  जितके जास्त ऐकाल तेव्हा एकाग्र चित्ताने ऐका.  जास्त प्रश्न न विचारता फक्त प्रेमाने आणि आदराने ते गायन/वादन ऐका.  साधारण १-२ वर्षे नियमित वरील पद्धतीने आणि हेतूने शास्त्रीय संगीत ऐकलेत की मग त्याच्या पुढच्या पायरीवर पोहोचायला तुम्ही तयार व्हाल असे मला वाटते.

आणखी काही माहिती मी वैयक्तिक संपर्कातून देऊ शकेन.

तुमच्या संगीत साधनेला सुयश चिंतितो.

कलोअ,
सुभाष