मी ही तुमच्यासारखाच. फक्त मला या प्रश्नांची उत्तरे काही तज्ञांनी दिली ती अशी.
१. यातल्या तिसर्या कडव्याचा अर्थ काय?
क्षमस्व. इथे मी काही मदत करू शकत नाही.
२. हे कुणी, कधी लिहिले? भाषा कोणती आहे?
शास्त्रीय संगीतातील चीजा वा बंदिशी या प्रामुख्याने 'व्रज' भाषेत (वृंदावन-मथुरेच्या आसपास बोलली जाणारी बोलीभाषा) असतात. या बंदिशी अनेक प्रथितयश गायकांनी तयार केलेल्या असतात. प्रामुख्याने त्या गुरुमुखाने शिष्यांना मिळतात. वरील चीज बहुधा जसराजजींनी स्वतःच बांधली आहे.
३. याबाबत मायाजालावर काही माहिती उपलब्ध आहे का?
महाजालावर काही माहिती उपलब्ध आहे. भोमेकाकांनी एक लेख लिहून अशा स्थळांची यादी संकलित करण्याचा उपक्रम चालू केला आहे. त्यावर लक्ष ठेवा. त्या ठिकानी मी राजन पर्रीकर नावाच्या एका व्यक्तीच्या लेखांचे स्थळ दिले आहे, ते जरूर पहा.
४. पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे मूलभूत धडे घेण्यासाठी तबकड्य़ांवर व्याख्याने उपलब्ध असतात. अशी सोय भारतीय शास्त्रीय संगीताच्या बाबतीत आहे का?
-विचक्षण