आजच महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेली पाककृती-
बाजरीची खिचडी
कृती : खोबरं आणि लसूण मंद आंचेवर भाजून त्याची गोळी वाटावी. काळ्या मसाल्याचं (काळ्या मसाल्यासाठी सहा लवंगा, दोन वेलची, एक तुकडा दालचिनी, अर्धा चमचा शहाजिरं, तीन लाल सुक्या मिरच्यासाहित्य भाजून त्याची बारीक पूड करावी.) तापलेल्या तेलात जिरं मोहरी घालावी. त्यावर चिरलेला कांदा, हळद, हिंग घालावं. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात वाटणाची गोळी, काळा मसाला घालावा. त्यावर मोड आलेली बाजरी आणि धुतलेला तांदूळ घालून परतावं. आवश्यक तेवढं पाणी आणि मीठ घालून खिचडी शिजू द्यावी. वाढताना साजूक तूप आणि कोथिंबीर पेरून वाढावी.
कदाचित यात मिरची न घालता पूर्वी बनवत असावेत.
लोकसत्तेत पूर्वी मोहसीना मुकादम यांचे भारतीय खाद्यसंस्कृती विषयी अभ्यासपूर्ण लेख येत असत. कदाचित त्यात माझ्या बऱ्याचश्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. पण मला हे लेख सध्या मिळत नाहीत. कुणाकडे आहेत का?
साती