बाँबसारखे विघातक अस्त्र निर्माण करण्याची शक्ती अंगी असतानाही उपोषणाच्या मार्गाने अन्यायाचा निषेध काही थोडेच करू शकतात. आणि इतर लोक उपोषणचे हत्यार परकीयांच्या विरुद्ध वापरण्याऐवजी आपली मनमानी सहन करण्यासाठी देशबांधवांनाच(किंवा देशपुत्रांना!) वेठीला धरण्यासाठी वापरत असताना त्या शस्त्राचा नैतिकदृष्ट्या योग्य उपयोग करून दाखवणारे तर विरळाच.
त्या दृष्टीने जतीन दास हे आपल्या बलिदानाने सर्वोच्च स्थानी पोचले होते यात वादच असू शकत नाही. त्यांनी दाखवलेला अजोड संयम आणि अतुलनीय ध्येयनिष्ठा यांच्यापुढे नतमस्तक व्हवे. तरच त्यांचा योग्य सन्मान होईल. कुठल्याही प्रकारच्या वैयक्तिक किंवा राजकीय लाभाची आस न धरता केवळ जाज्ज्वल्य राष्ट्रभक्ती आणि देशाबद्दलचे आपले कर्तव्य यांनी प्रेरित होऊन त्यांनी हे बलिदान दिले. अशा प्रकारचे दुसरे उदाहरण सापडणे कठीण आहे. त्यांचे प्राणांतिक उपोषण ही त्यांची स्वघोषित लढाई होती ज्याचा लाभ त्यांच्यानंतर राजनैतिक कारावास भोगणाऱ्या कितीतरी नेत्यांना मिळाला यावरूनच त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही हे सिद्ध होते. जरी त्यातल्या फार थोड्या नेतेमंडळींनी जतीनदांचे हे उपकार मानले असले तरी त्यांचे कार्य कुठल्याही परतफेडीच्या अपेक्षेने केले गेले नव्हते तर ते खऱ्या अर्थाने निष्काम असे कर्म होते म्हणूनच त्याची थोरवी मोजता मापता येत नाही. त्यांच्या केवळ स्मरणाने तरुण मनांमधे उचंबळून येणारी स्फूर्ती आणि त्यांच्या अंगावर उमटणारे रोमांच हीच त्यांच्या कार्याची पावती ठरेल. त्यांना माझे नम्र अभिवादन.
अर्थात इथे संकेतस्थळावर संख्याशास्त्रीय पळवाटा वापरून सैनिकांचा 'व्यवसाय' सर्वात सुरक्षित असतो असे सिद्ध करू पाहणाऱ्या काही लोकांना ध्येयासाठी प्रयत्न करत असताना जिंकू किंवा मरू अशा भावनेने केलेले बलिदान आणि आत्महत्या यातला फरक कळेल अशी शक्यता हजार हिश्श्यांत एकही नाही. त्यामुळे त्यांनी खुशाल जतीन दास यांच्या बलिदानाला आत्महत्या म्हणावे . किंबहुना  त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. 
--अदिती