आपण येथे चर्चेस प्रस्ताव मांडला असल्यामुळे प्रत्येक मनोगतीसाठी तो आहे. ज्यांना आवडेल ते भाग घेतील. पण 'तुमचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही.' हे सांगण्याचा तुमचा हक्क नाही. हे विधान व्यासपीठीय संकेतांचा भंग करणारे आहे.

सहमत. खुल्या चर्चेत भाग घेऊन प्रत्येक जण आपले विचार (सकारात्मक/ नकारात्मक) मांडू शकतो.

अवांतर:

१) चर्चा सुरू करताना चर्चेचा उद्देश स्पष्ट न केल्यास चर्चा अयोग्य मार्गाने जाऊ शकते याची नोंद घ्यावी.

खरंय. (स्वानुभव)

२) आधी होऊन गेलेल्या चर्चांची माहिती तुम्हाला नसणार हे गृहीत धरले आहे. तरी या विषयावरील अधिक माहितीसाठी 'ह्यावरून आठवलं' यात सापडणाऱ्या चर्चा वाचाव्यात.

चर्चा सुपूर्त करून संपादित झाल्यावरच 'ह्यावरून आठवलं' दिसून येतं. चर्चे संबंधित शोध घेतला असताही तो बरेचदा योग्य शब्दाने (keyword) न केल्याने फसला जातो.

अशा कारणाने पुन्हा पुन्हा एकाच विषयावरच्या चर्चा सुरू होतात. वेगळेपणा दिसण्यासाठी चर्चा प्रवर्तकाने आपली उद्दिष्टे मांडून इतरांकडून आपल्याला काय अपेक्षित आहे त्याचा खुलासा करावा.