मांसाहारी नाही म्हणून शाकाहारी ही तर्कदुष्टता आहे.

या मताबद्दल अनेक धन्यवाद.  माणूस मांसाहाराच्या बरोबरच शाकाहारही करत असतो. आठवड्यातून rather दिवसांतून एखादे वेळेस किंवा जेवणातला एखादा पदार्थ मांसाहारी असला म्हणजे माणूस मांसाहारी कसा होतो? कारण त्याच्या जेवणातले इतर पदार्थ शाकाहारी असतात ना.

आतड्यांचा मुद्दा वारंवार प्रकट केला जातो. परंतु मनुष्य आपले जेवण शिजवून खातो. (फळे आणि इतर काही पदार्थ सोडून तसे raw meat ही काही ठिकाणी खाल्ले जाते. असे अपवाद सोडून) कच्च्या पदार्थांचे पचन आणि शिजवलेल्या पदार्थांचे पचन यांत फरक असतो असं मला वाटते.

ब्राह्मणांना मांसाहार वर्ज्य हा दुसरा खोडसाळ प्रचार. फारतर महाराष्ट्र आणि इतर काही विभागातल्या ब्राह्मणांना तो वर्ज्य असे म्हणता येईल कारण बंगाली ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, दैवज्ञ ब्राह्मण मिश्राहारी असतात. (आता आपल्या जाज्वल्य ब्राह्मणत्वाचा पुरस्कार करणाऱ्या जातियवाद्यांना कोकणस्थ, देशस्थ आणि कऱ्हाडे एवढ्याच ब्राह्मणी जाती दिसत असतील तर काय बोलावे?)

माणूस मिश्राहारी आहे हे मला पटले आणि मृदुलाचे म्हणणे आवडले. धन्यवाद.