मराठीत चिजा नाहीतच असे नाही.माझ्या लहानपणी माझ्या मोठ्या बहिणीस गाणे (असेच आम्ही म्हणायचे)शिकवावयास येणाऱ्या मास्तरांनी (हाच शब्द त्यावेळी आदरार्थी वाटे)शिकवलेल्या चिजांपैकी काहींचे मुखडे मला आठवतात.
१।निशिदिनि मनि धरिला हरीला (भैरवी)
२)नुरले मानस उदास (तिलककामोद)
३)ही अति गोड गोड ललकारी (भिम पलास)
याला गायन शास्त्री चिजा समजतात की नाही हे मी त्यातील तज्ञ नसल्यामुळे मला निश्चितपणे सांगता येणार नाही.याना चिजा म्हटलेच पाहिजे असा माझा आग्रह नाही. या विषयावर वाद नको म्हणून आधीच खबरदारी !