घर दार खाउ आणि वासे तोंडी लावु.
झाड कुणी लावले आणि फळे कोण खात आहेत. (याच आशयाची गुजराथी म्हण - मेहेनत करे मर्गो ने ईंडो खाय फकिर)(मर्गो - कोंबड्या. इंडा - अंड)
खाउन टाकणे - (हे गवई लोक असे नरभक्षक तबलजी का बाळगतात कोण जाणे? - पुलं)
जरा गंमत - बंगलीत खाणे, पिणे, सिगारेट ओढणे या सर्वाला खाणे हेच क्रियापद वापरतात जसे बिस्कीट खाबो, चाय खाबो, सिगरेट खाबो. पूर्वी एकदा कलकत्त्यात मी नवीनच असताना माझ्या एका सहकाऱ्याने मला 'कोक खाएगा? ' असे विचारले तेव्हा मी चक्रावून गेलो होतो.