प्रिय बळवंतराव,
मलाही ही रचना त्यांचीच वाटत होती परंतु क्रांतिचे अभ्यासक कै. वि. श्री.
जोशी यांचा एक उल्लेख ही रचना हसरत मोहानी यांची असल्याचे सांगत असल्याने
तसा उल्लेख केला, कदाचित ती हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांचीच असेल.
चुकिच्या दुरुस्ती बद्दल धन्यवाद.
कसे कसे. आम्ही केवळ सत्यशोधक.
पण तुमच्या शैलीत असे म्हणता येईल - :) (बघा ) इकडची तिकडची चार-बुके वाचून, त्यातले उतारे ढापून, स्वतःला उगाच गाढे अभ्यासक-लेखक म्हणवून घेणारे अभ्यासक ह्या जगात खूप आहते. पण खरे व्यासंगी बोटावर मोजण्याइतकेही नसतात. ::):):) वगैरे वगैरे वगैरे.
असो. मला खटकणाऱ्या आधीच्या मुद्द्यावर तुम्ही विचार केला असावाच असे वाटते.
चित्तरंजन
अवांतर
कदाचित ती हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांचीच असेल.
अहो रामप्रसाद बिस्मिल ह्यांची मलाही वाटायची. पण तसे नाही. बिस्मिल अज़ीमाबादी ह्यांची ही रचना आहे. खालील लेख वाचून खातरजमा करता येईल.
लेख पहिला
लेख दुसरा
हसरत मोहानी हे फार मोठे टिळकभक्त होते. त्यांनी टिळकांवर कविताही केली आहे. ती मिळाल्यास इथे देईनच.