विषयांतर:
"देवनाम प्रिय" नव्हे, "देवानाम् प्रिय प्रियदर्शी" असा स्वत:चा उल्लेख करण्याचा अशोकाचा प्रघात होता असे आठवते.
देवानाम् प्रिय म्हणजे देवांचा आवडता (म्हणजे कदाचित देवांना आवडेल अशी कार्ये करणारा असावा)
प्रियदर्शी व प्रियदर्शन यातील फरक काबिलेग़ौर आहे. प्रियदर्शन म्हणजे ज्याचे दर्शन (सर्वांना) प्रिय आहे असा, तर प्रियदर्शी म्हणजे (सर्वांकडे) प्रेमाने पहाणारा. (हेही इकडच्या-तिकडच्या वाचनातलेच आहे, संस्कृतज्ञानाचा दावा नाही, तज्ज्ञांनी तपासून पाहिलेले बरे)
इतरांसाठी यापैकी प्रियदर्शन हे नाव अधिक आकर्षक वाटले तरी राजाच्या बाबतीत प्रियदर्शी हे नाव/बिरुद जास्त योग्य वाटते. म्हणून अशोकाला मी दाद देतो.
पण इंदिराबाईंचे जवाहरलालांनी ठेवलेले "प्रियदर्शिनी" हे नाव चुकून निवडलेले होते असे कुठेतरी वाचले आहे, खरा त्यांच्या मनात "प्रियदर्शनी" हाच अर्थ होता म्हणे. अर्थात नेहरूंना या बारकाव्याचे ज्ञान असणे फारसे अपेक्षित असू नये.