गेली काही वर्षे मी अमेरीकेत वास्तव्याला आहे.आपण कल्पना करू शकता की अमेरीकेत तरूण मुली आणि स्त्रिया अंगप्रदर्शन करणारे कपडे घालतात. माझे विद्यापीठ अमेरीकेच्या दक्षिणेकडील राज्यात आहे.आमच्याकडे बर्फ पडत नाही आणि उन्हाळ्यात खूपच गरम होते.उन्हाळ्यात आमच्या विद्यापीठातील गोऱ्या विद्यार्थिनी अगदी 'टू पीस' मध्ये सूर्यस्नान करताना भर विद्यापीठाच्या आवारात ग्रंथालयासमोर अनेकदा दिसतात.भारतात असे प्रकार पाहिले नसल्यामुळे म्हणा की एक पुरूष म्हणून जन्माला आल्यामुळे असलेल्या आकर्षणामुळे म्हणा मी अमेरीकेत नवीन असताना अशी दृष्ये अगदी चवीने बघत असे

 

हे सहज मान्य करायला धाडस लागतं. (म्हणजे खुद्द क्लिंटन साहेबांना किती काळ लागला होता याची आठवण करा. :) ) काय असत हे जर पुरूषाने केलं तर बरेचदा तो त्याचा हक्कच आहे असं समजणारे बरेच महाभाग मिळतात आणि हेच जर बाईने केलं तर तिला कुठल्या शेलक्या उपाध्या मिळतील या बाबत न बोललेलं बरं.

विवेकबुध्दी जागृत असलेले लोक फारफार तर 'आयत्या' दिसणाऱ्या अंगप्रदर्शनाचे 'नेत्रसुख' घेऊ शकतील पण त्यापलीकडे काहीही करणार नाहीत.

सहमत. त्यावर स्त्रीयांचा आक्षेप असतो असे मला वाटत नाही.

आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे स्त्रिया जर तोकडे कपडे घालत असतील तर पुरूषांची कामवासना चाळविण्यासाठी घालतात असा अर्थ का घ्यावा?

सोयिस्करपणाचा मुद्दा थोडा बाजूला ठेवूया. मिनीस्कर्ट सोयिस्कर असतो असं मला व्यक्तिशः वाटत नाही. शॉर्टस् किंवा Skort असतो असे वाटते. परंतु सोयिस्कर नसला आणि इतरांनी आपल्याकडे वळून पाहावे अशी स्त्रीची इच्छा असली* तरी त्या वळून पाहणाऱ्याने परतून छेड काढावी किंवा बलात्कार करावा अशी इच्छा खचितच नसते.

* पुरूष किंवा स्त्री हे आपापले पोशाख स्वतःला आवडतात म्हणून आणि दुसऱ्यांना आवडावेत म्हणून आकर्षक बनवतात. आरशांत निरखून पाहणे, केसांवरून हात फिरवणे, कपडे ठिकठाक असल्याची खात्री करून घेणे यासारखे प्रकार स्वतःबरोबरच इतरांनाही आपण आकर्षक दिसतोय याची खातरजमा करण्यासाठी होतात.