कुशाग्र, परी आणि बदक,
तुम्हाला माहीत असलेल्या, तुम्ही वर उल्लेखलेल्या मराठी चिजा कृपया संपूर्ण लिहाल का? सदया मम ही चीज मीही शिकले होते ती अशी -
राग बिलावल
सदया मम प्रभू राम दयाघन
अमित अघ हरूनी चुकविसी माया ॥
मज अभय झणी दे रघुराया
गांजिती या विपती भोर सदया ॥।
ह्यामध्ये काही चूक आढळल्यास कृपया सांगा. अस्थाईच्या दुसऱ्या ओळीचा अर्थ मला नीट समजलेला नाही.